PM KISAN : 10 व्या हप्त्याचे पैसे अद्यापही खात्यात आले नसतील तर असा करा अर्ज..!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना PM किसान योजनेचा १० वा हप्ता १ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. मात्र अद्यापही जवळपास ६५ लाखांहून आधीक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. मात्र काळजीचे कारण नाही अजूनही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती आजच्या लेखात घेऊया…

योजनेसाठी पात्र आहेत पण 10 हप्ताच मिळाला नाही त्यांना एक अर्ज करुन 31 मार्च पर्यंत रखडलेला हप्ता मिळवता येणार आहे. पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात येण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला अर्ज करावा लागेल. हा अर्ज कुठे आणि कसा करावा याची माहिती घेऊया…

असा करा अर्ज

–पंतप्रधान-किसान पोर्टलला https://pmkisan.gov.in/ भेट देऊन तुम्ही स्वत:ला अर्ज करू शकता.
–मग उजवीकडे तुम्हाला FARMER CORNERS पर्याय दिसेल.
–त्यावर नवीन FARMER CORNERS क्लिक करा.
— त्यानंतर नविन पान ओपन होईल ज्यामध्ये शहरी आणि ग्रामीण शेतकऱ्यांचा पर्याय असेल.
–यामध्ये तुम्हाला अवगत असलेली भाषा निवडून फॉर्म भरायचा आहे.
–त्यानंतर वैयक्तिक माहिती भरताना आधार क्रमांक, मोबाइल नंबर, राज्य नाव टाकावे लागणार आहे.
–त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी आणि त्यानंतर captcha कोड टाकायचा आहे.
— त्यानंतर आपल्यासमोर पुन्हा नवीन पेज ओपन होईल यामध्ये राज्ये, जिल्हे, तहसील, ब्लॉक आणि गावे भरावी लागतील. लिंग व श्रेणी, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पत्ता, आई, वडील किंवा पती यांचे नाव, जमीन नोंदणी ओळखपत्र, रेशन कार्ड क्रमांक, जन्मतारीख आणि जमीन रेकॉर्ड भरून ते बरोबर आहे का ते पहावे लागणार आहे.
–याशिवाय सांगतील ते काही पेपर अपलोड करणे देखील आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!