PM KISAN : अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा 11 वा हप्ता, यात तुमचा तर समावेश नाही ना ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. ही योजना 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती, या अंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा करते. मात्र ही योजना आर्थिक दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेली योजना आहे. मात्र काही सधन लाभार्थी याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार ऍक्शन मोड वर आले असून अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जात आहेत.

कधी मिळणार योजनेचा 11वा हप्ता ?

केंद्र सरकारच्या महत्तवाकांक्षी पीएम किसान योजनेचा १० हप्ता १ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. आता शेतकरी या योजनेचा ११ वा हप्ता येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. हा हप्ता एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान येईल असे सांगितले जात आहे. मात्र हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा होणार नाही. यासोबतच आम्ही या लेखात असे काही टोल फ्री क्रमांक तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, ज्यावर कॉल करून तुम्ही या योजनेशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकता.

पंतप्रधान किसान योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?

–असे शेतकरी, ज्यांचे कुटुंबातील सदस्य (पती-पत्नी आणि अल्पवयीन मुले) कर भरतात, त्यांना या योजनेंतर्गत पैसे मिळत नाहीत.
–संस्थागत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
–असे लोक जे संवैधानिक पदावर किंवा सरकारी नोकरीवर आहेत आणि ते शेती करतात, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.
–ज्यांच्याकडे शेतजमीन नाही अशा लोकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
–जे सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांना दरमहा 10,000 हजार रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन मिळते, जर असे लोक शेती करत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
–नोंदणीकृत डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए असे लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

पीएम किसान टोल फ्री नंबर

–पीएम किसान हेल्पलाइन नंबर- 155261, 0120-6025109
–पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266
–पीएम किसान लँडलाइन नंबर- ०११-२३३८१०९२, ०११-२४३००६०६, ०११-२३३८२४०१
–याशिवाय, तुम्ही [email protected] या ई-मेल आयडीवर मेल करून यासंबंधी कोणतीही माहिती घेऊ शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!