PM KISAN : नववर्ष भेट…! PM मोदींकडून शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटींची रक्कम वर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती तोच PM किसान चा १० वा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून देशातील १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. मोदी सरकारने या योजनेअंतर्गत २०,००० करोड ची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना १४ हजार कोटींचे अनुदान खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्या वर्षाचे गिफ्ट मोदी सरकार कडून मिळाले.

1 डिसेंबर 2018 पासून लागू झालेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत 11.5 हून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 1.61 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पाठवली आहे. असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी गुजरात येथील संमेलनात ‘नैसर्गिक शेती’ वर भर देण्यात आला होता. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील नैसर्गिक शेती करणाऱ्या उत्तराखंड येथील शेतकऱ्याशी मोदींनी संवाद साधला तसेच नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.

महिलांकडून चालवले जाते FPO
आजच्या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले तामिळनाडू येथील महिलांद्वारे चालवली जाणारी FPO. संपूर्णपणे महिलांद्वारे ही FPO चालवली जाते. या महिलांकडून सोर्घम म्हणजेच ज्वारी आणि त्यापासून बनवलेले अनेक उत्पादन तयार करून विक्री केली जातात. या महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या FPO चे मोदींनी कौतुक केले.

राजस्थानातील मध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद
राजस्थानातील मध उत्पादक शेतकऱ्यांशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती मिळाल्यानंतर आम्ही कंपनी स्थापन केल्याचं शेतकरी म्हणाले. राजस्थानातील शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, या संदर्भात आम्ही विचार करुन मोहरीच्या हंगामात आम्ही माशांच्या पेट्या लावतो, असं इंद्रपाल म्हमाले.

Leave a Comment

error: Content is protected !!