PM KISAN : केवळ 1 दिवस बाकी; 2000चा 10वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी मंत्रालयाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सरकार 15 डिसेंबर 2021 रोजी पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पैसे 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत.

पीएम किसान लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य
मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 मध्ये मोठा बदल केला आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यासच त्यांना पुढील हप्ता मिळेल. त्याशिवाय त्यांचा हप्ता येणार नाही.सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे.

पंतप्रधान किसानचा शेतकऱ्यांसाठी संदेश
पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य असल्याचे सरकारी पोर्टलचे म्हणणे आहे. त्यात सांगितले आहे की आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी फार्मर कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा असे सांगण्यात आले आहे.

ई-केवायसी कसे भरावे
— PM KISAN च्या अधिकृत संकेतस्थळावर जा https://www.pmkisan.gov.in/
–उजव्या बाजूला तुम्हाला eKYC लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
–आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
–यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका
–जर दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर eKYC पूर्ण होईल अन्यथा नाही.
–ई-केवायसी ऑफलाइन भरण्यासाठी तुम्ही आधार सेवा केंद्राचीही मदत घेऊ शकता.

तपासा अद्ययावत लाभार्थी यादी
याशिवाय, शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जाची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी पीएम किसान लाभार्थी स्थिती आणि यादी देखील तपासली पाहिजे. यासाठी, त्यांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, आणि शेतकरी कॉर्नर विभागात, तपशील जाणून घेण्यासाठी लाभार्थी स्थिती किंवा लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल.

Leave a Comment

error: Content is protected !!