PM Kisan योजनेचे २००० अद्याप खात्यात आले नाहीत ? ‘या’ क्रमांकावर करा संपर्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने अल्प व सीमांत शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार एका वर्षामध्ये शेतकऱ्यांना ३ हप्त्यांमध्ये ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत 8 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात नुकताच आठवा हप्ता जमा

14 मे 2019 रोजी नुकतेच मोदी सरकारने दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले आहेत. मोदी सरकार कडून वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये म्हणजेच वर्षाचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. मात्र तरीदेखील काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत. जर तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळाली नाही तर तुम्ही दिलेल्या नंबरवर तक्रार करू शकता आणि पैसे का जमा झाली नाही त्याचे कारणनही जाणून घेऊ शकता.

जर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे नाही जमा झाले तर तुम्ही तक्रार करू शकता. तुम्ही पी एम किसान हेल्पलाइन नंबर वर कॉल करून तक्रार देऊ शकता. पी एम किसान सन्मान चा हेल्पलाइन नंबर आहे- 011-24300606 या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता.

हे आहेत महत्वाचे संपर्क क्रमांक

<< पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266

<< पीएम किसान हेल्पलाइन नंबर:155261

<< पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401

<< पीएम किसान ची नवी हेल्पलाइन: 011-24300606

<< पीएम किसान ची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109

<< ई-मेल आयडी : [email protected]

Leave a Comment

error: Content is protected !!