पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे अपात्र शेतकरी केंद्राच्या निशाण्यावर, पैसे परत घेण्याचे काम सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : चुकीच्या पद्धतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. सध्या या योजनेतील आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे. पी एम किसान योजना लाभार्थ्यांच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. या अपात्र शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्याकडून पैसे परत घेण्याचं काम सुरू आहे.

अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला होता. ज्या पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून आता रक्कम वसूल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याबरोबरच या योजनेतून त्यांचे नाव देखील कमी करायला सुरुवात केली आहे. दैनिक जागरण ने दिलेल्या माहितीनुसार झारखंडमधील कोरडरमा जिल्ह्यातील 578 अपात्र शेतकरी आढळून आले आहेत ते शेतकरी इन्कम टॅक्स भरत असून देखील त्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतला होता. कृषी मंत्रालयाने पी एम किसान योजनेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्या माहिती असणं आवश्यक आहे. सरकारी अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र केंद्र आणि राज्य सरकार मधील मल्टी टास्किंग स्टाफ किंवा चतुर्थश्रेणी किंवा श्रेणीतील कर्मचारी यास पात्र आहेत.

अशांना मिळत नाही पीएम किसान योजनेचा लाभ

— संविधानिक पदावर असणारा किंवा मंत्री असणारा शेतकरी
— नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधानपरीषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य
— केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी
— प्राप्तिकर भरणारे शेतकरी
— 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे शेतकरी
— डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकिल

Leave a Comment

error: Content is protected !!