PM Kisan Sanman Yojna : आता घरबसल्या मोबाईलवर करा पीएम किसान योजनेची नोंदणी ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सन्मान निधी योजना हि केंद्र सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना आहे. या योजनेचा फायदा आतापर्यंत करोडो शेतकऱ्यांना झाला आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी आणखी सुलभ उपक्रम राबवण्यात येत आहेत. या योजनेसाठी शेतकऱ्यांना आधी सीएस केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागत होती मात्र आता त्यात आणखी सुलभता आणली आहे. याकरिता एक मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे या मोबाईल ॲप द्वारे शेतकरी घरबसल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी करू शकतो. एवढंच नाही तर या ॲपच्या माध्यमातून खात्यावर ची रक्कम किती आहे आणि याची माहिती देखील मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होऊ नये आणि अपात्र शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळू नये यासाठी केंद्र सरकारची ही धडपड सुरू आहे.

खास पी एम किसान सन्मान निधी साठी केंद्र शासनाकडून जीओ आय(GOI )या नावानं नवीन मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत पाच मिलियन लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. गूगल प्ले स्टोर ला जाऊन देखील तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता.

असे करा GOI मोबाईल अँप डाउनलोड
–कोणत्याही स्मार्ट फोनमध्ये PM Kisan GOI हे मोबाईल अॅप सहज डाउनलोड करता येणार आहे.
— डाऊनलोड नंतर ज्यांना पीएम किसान निधीसाठी नोंदणी करायची आहे, त्यांना अॅपमध्ये ‘न्यू फार्मर रजिस्ट्रेशन’वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
–ही प्रक्रिया केल्यानंतर एक नवीन अर्ज समोर येणार आहे.
–यामध्ये मागितलेली सर्व माहिती व्यक्तींना भरावी लागणार आहे.
— विचारलेली माहिती पूर्ण झाल्यावर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करावे लागणार आहे.
— तो मंजूर होताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
–त्याचबरोबर या अॅप किंवा योजनेशी संबंधित अधिक माहिती पंतप्रधान किसानच्या हेल्पलाइन नंबरवर 155261 येणार आहे.
–तसेच 011-24300606 या क्रमांकावरूनही मिळविता येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!