PM KISAN : योजनेचा 11 वा हप्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात ; तपासा अद्ययावत लाभार्थी यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो पीएम किसान योजनेचा (PM KISAN) हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत ११ वा हप्ता शेतकरयांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २००० रुपये जमा केले जातात. ११ हप्ता वितरण करण्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता जवळपास झाली आहे त्यामुळे लवकरच ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत जवळपास ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.

पीएम किसान नवीन यादी कशी तपासायची

  • अधिकृत सरकारी वेबसाइटवर जा
  • होमपेजवर ‘फार्मर्स कॉर्नर’ शोधा आणि ‘लाभार्थी यादी’ पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव तपशील काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
    सर्व तपशील भरल्यानंतर, ‘Get Report’ वर क्लिक करा आणि तुम्हाला संपूर्ण यादी मिळेल.

पीएम किसान मध्ये eKYC कसे अपडेट करावे?

–यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
–पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
–आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि शोध वर क्लिक करा.
–आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
–‘Get OTP’ वर क्लिक करा आणि तुमचा OTP इथे टाका.

या संपूर्ण प्रक्रियेचे अनुसरण करून, तुम्ही तुमचे आधार लिंक करून तुमचे खाते अपडेट करू शकता. प्रविष्ट केलेल्या ओटीपीमध्ये कोणतीही चूक आढळल्यास, ते त्यांचे बायोमेट्रिक्स अद्यतनित करण्यासाठी सीएससी केंद्रांना भेट देऊ शकतात. तसेच, यासंबंधित इतर माहितीसाठी तुम्ही जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन माहिती गोळा करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!