PM Kisan योजनेचे महाराष्ट्रात 4.45 लाख अपात्र शेतकरी, सरकार 358 कोटी रुपये करणार वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : PM Kisan योजना ही मोदी सरकारची सर्वात महत्तवाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ६००० रुपये २०००च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केले जातात. मात्र काही अपात्र शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेताना आढळले आहेत. अशा शेतकऱ्यांकडून योजनेची रक्कम वसूल केली जाणार आहे. देशातील 42.16लाख अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर महाराष्ट्रातील 4,45,497 अपात्र शेतकऱ्यांनी या योअंजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 358 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान निधी चा लाभ देशात 42.16लाख अपात्र शेतकऱ्यांना घेता असून त्यांच्याकडून सरकार 29.927 कोटी रुपये वसूल करणार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात असे 4 लाख 45 हजार 497 अपात्र असून ते सरकारचे 358 कोटी रुपये देणे लागतात. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अनुदान योजनेचा लाभ एकूण 42 लाख 16 हजार 643 अपात्रांनाही दिला गेला. त्यांच्याकडून 29,927कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाणार आहे. यात सर्वात जास्त शेतकरी आसाम मध्ये 8.35 लाख, तमिळनाडूमध्ये 7. 22 लाख, पंजाब मध्ये 5. 62 लाख आणि महाराष्ट्राचे 4. 45 लाख आहेत.

सुजय पाटील, हिना गावित, श्रीकांत शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना तोमर यांनी ही माहिती दिली. योजनेत महाराष्ट्रातील 1. 14 कोटी पेक्षा जास्त शेतकर्‍यांची नोंदणी केली गेली होती. त्यात 1. 10 कोटी शेतकऱ्यांना दर वर्षी तीन हप्त्यात सहा हजार रुपये पेमेंट त्यांच्या बँक खात्यात दिले. लाभार्थी शेतकऱ्यांना सरासरी सहापेक्षा जास्त हप्ता सरासरी 12,545 रुपये मिळाले नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नावे राज्य सरकारं करतात.

कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकरी

अहमदनगर 6. 86 लाख, सोलापूर 6. 20 कोल्हापूर 5.47 लाख, सातारा 5.29 लाख आणि पुण्यातील 5.14 लाख सर्वाधिक शेतकरी योजनेचे लाभार्थी होते ठाणे 1.19 लाख , नंदुरबार 28 लाख पालघर 1.31 रायगड 1.52 गडचिरोली 1.52 आणि सिंधुदुर्ग चा 1. 54 लाख शेतकऱ्यांची संख्या आहे

Leave a Comment

error: Content is protected !!