PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये नाही मिळणार; ‘ही’ आहेत कारणे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबविली जाते. अशातच आता दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून या योजनेच्या 16 व्या हप्त्याची 2000 रुपये रक्कम देण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली असून, देशातील जवळपास 8 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी, त्यांचे 2000 रुपये वितरित करणार आहे. मात्र तुम्ही या योजनेसाठीच्या महत्वपूर्ण बाबींची पूर्तता केलेली नसेल, तर तुम्हाला 16 व्या हप्त्याची 2000 रुपये रक्कम मिळणार नाही. त्यामुळे आत्ताच जवळच्या डिजिटल सेवा केंद्रात जाऊन, आपला 2000 रुपयांचा मिळणारा हप्ता (PM Kisan Yojana) निश्चित करा.

कोणाला नाही मिळणार लाभ? (PM Kisan Yojana 16th Installment)

जर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत नियमित 2000 रुपयांचे 15 हप्ते मिळाले असतील. मात्र, तुम्ही या योजनेच्या 16 व्या हप्त्यासाठी बँक खात्याशी जोडलेल्या आधार क्रमांकासोबत ई-केवाईसी आणि जमिन सत्यता पडताळणी केलेली नसेल. तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा 2000 रुपयांचा 16 वा हप्ता वितरित केला जाणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे 15 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून, यावेळी जवळपास 8 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा : पीएम किसान योजनेची ई-केवायसी घरबसल्या करा; फॉलो करा या स्टेप्स…(https://hellokrushi.com/pm-kisan-yojana-do-e-kyc-from-home/)

काय आहे ही योजना?

शेतकऱ्यांना शेतीमध्ये आर्थिक मदत व्हावी. या उद्देशाने केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 पासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची (PM Kisan Yojana) सुरुवात केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये सरकारकडून दिले जातात. असा वर्षभरात तीन वेळा 2 हजार रुपयांचा हप्ता वितरित केला जातो. त्यामुळे आता तुम्हीही या योजनेसाठीची 16 व्या हप्त्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली नसेल. तर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तात्काळ ई-केवाईसीसह आधार लिंकची प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

error: Content is protected !!