PM Kissan Yojana | शेतकऱ्यांना मिळणार 36,000 रुपये पेन्शन; अशी करा नोंदणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशामध्ये ११.५ कोटी ग्राहकांची नोंदणी करण्यात आली आहे. ३६ हजार रुपये पेन्शन असणाऱ्या मोदी सरकारच्या या योजनेचा शेतकरी आता दरवर्षी लाभ घेऊ शकतात. आणि विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याच कागद पत्रांची विचारणा केली जाणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृद्धकाळात ही योजना सगळ्यात महत्त्वाची आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पंतप्रधान-किसान योजनेतून मिळालेल्या ६००० रुपयांपैकी या योजनेसाठी थेट पैसे वजा केले जाणार आहेत. ही योजना वृद्धकाळात सगळ्यात महत्त्वाची आहे.

PMKMY योनजेअंतर्गत १२ कोटी अल्पभूधारक आणि सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.या योजनेमध्ये किमान प्रीमियम ५५ ते २०० रुपयांपर्यंत आहे. जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५० टक्के (१५०० रुपये) रक्कम मिळेल.जेवढा प्रिमियम शेतकरी भरेल तेवढा केंद्र सरकारही देईल. जर तुम्हाला ही पॉलिसी सोडायची असेल तर त्यामध्ये जमा केलेले पैसे आणि त्याचं व्याज तुम्हाला मिळेल. या योजनेत नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) इथं नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. तसेच यासाठी आधार कार्ड महत्वाचे आहे. सोबत २ फोटो आणि बँक पासबुकसुद्धा आवश्यक आहे. नोंदणी दरम्यान किसान पेन्शन युनिक क्रमांक आणि पेन्शन कार्ड तयार केले जाणार आहे.

शेतकरी पेन्शन योजनेमध्ये १ जानेवारी २०२१ पर्यंत २१,१०,२०७ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतून हप्ता (प्रीमियम) वजा केला जाणार आहे. या पेन्शन फंडाची काळजी घेण्यासाठी भारतीय आयुर्विमा (LIC) महामंडळाला नेमण्यात आलं आहे. या पेन्शन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ कोटी शेतकर्‍यांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन देण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!