PM Kisan : योजनेचे 2000 रुपये खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी P M KISAN योजनेचा नववा हप्ता सोमवारी शतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. हा कार्यक्रम आज दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू झाला. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून तब्बल 19 हजार 500 कोटी रुपये थेट देशातील 9. 75 करोड शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. अर्थात हे पैसे टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही तुम्ही याबाबत सरकारच्या हेल्पलाइनवर कॉल करून तक्रार करू शकता. कधी कधी सरकारकडून खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात, परंतु ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकामध्ये चूक असू शकते.

कुठे कराल तक्रार ?

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या भागातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक तुमचे शब्द ऐकत नाहीत, तर तुम्ही त्याच्याशी संबंधित हेल्पलाईनवर देखील कॉल करू शकता.

या ठिकाणी करा संपर्क

–हेल्पलाईन नंबर 011 24300606 /011 23381092 वर कॉल करू शकता.
— सोमवार ते शुक्रवार, PM किसान हेल्प डेस्क (PM KISAN हेल्प डेस्क) pmkisan [email protected] वर संपर्क साधता येईल.
— तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या या हेल्पलाईनवर फोन करून माहिती मिळवू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!