लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात, पहा क्रेटचा दर किती ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशकातील लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 600 क्रेट्स मध्ये डाळींब लिलावसाठी दाखल झाले होते. यातील एका 20 किलो क्रेट्समधील डाळिंबाचा शुभारंभांचा लिलाव करण्यात आला त्याला 5,200 रुपये इतका कमाल बाजार भाव लिलावात मिळाला. उर्वरित डाळिंब क्रेट्सला 2000 ते 1800 रुपये इतका सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

यावेळी बोलताना बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले की, “शेतकरी व व्यापारी वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येथून दररोज देशातर्गत दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहारसह इतर राज्यात मोठ्या प्रमाणत डाळिंब जात आहेत. याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होत असून त्यामुळे चालू हंगामातील डाळिंब लिलाव जून महिन्यापासून सुरु करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या डाळींबाची प्रतवारी करून विक्रीसाठी आणल्यास योग्य बाजार भाव मिळेल” असे जगताप म्हणाल्या.

2014 पासुन डाळींब लिलाव

लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांनी डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. या परिसरातील शेतक-यांना डाळींब विक्रीसाठी जवळ सोय निर्माण व्हावी म्हणून लासलगांव बाजार समितीने सन 2014 पासुन डाळींब लिलाव सुरू केले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!