राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील दोन दिवसांपासून हळूहळू तापमानात वाढ होते आहे. मात्र पहाटेचा गारठा कायम आहे. पुढील ३ दिवसात तापमानात ३-५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या 5 दिवसात भारतातील उत्तर पश्चिम भागात बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय बदल|ची शक्यता नाही. येत्या 2 दिवसात मध्य भारतातील बहुतांश भागात किमान तापमानात 2-3°C ने वाढ होण्याची शक्यता आहे तर येत्या 3 दिवसात पूर्व भारतातील बहुतेक भागात किमान तापमानात 3-5°C ने हळू वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशात दोन वेस्टन डिस्टर्बन्स मूळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिला 15 ते 16 फेब्रुवारी दरम्यान आणि दुसरा 17- 23 फेब्रुवारी च्या रात्री असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील किमान तापमान खालीलप्रमाणे
नांदेड 19.4, जळगाव 12.2, सातारा 12.5, रत्नागिरी 19.1, महाबळेश्वर १३, परभणी 18.3, कोल्हापूर 17.1, सांगली 16.5, डहाणू 17.5 ,चिखलठाणा 14.8, जालना 17.7, सोलापुर 19.2, नाशिक 11.8, पुणे 12.3, मालेगाव 11, हरणाई 19.8, माथेरान 15.4, बारामती 13.3, अहमदनगर 12.6 ,जेऊर 14 आणि नागपूर 16.7

Leave a Comment

error: Content is protected !!