राज्य सरकार ई -पीक पाहणीच्या धर्तीवर ई -पंचनामा उपक्रम राबवण्याची शाक्यता ; शेतकऱ्यांची जबाबदारी वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये इ पीक पाहणी तसेच पाणंद रस्ते योजना यांचा समावेश आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्य सरकार ‘ई- पीक पाहणी’ प्रमाणेच आणखी एक महत्वाचा उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे. आता ई – पंचनामा हा उपक्रम राज्य सरकार कडून राबवला जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पिक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात अनेकदा खेटे मारावे लागत होते. मात्र डिजिटल स्वरूपात ई पीक पाहणी च्या माध्यमातून आता शेतकऱ्यांनी आपला इ पीक पाहणी कार्यक्रम ऑनलाइन राबवला आहे. याच पद्धतीने ई – पंचनामा हा उपक्रम राज्य सरकारकडून राबवला जाण्याची शक्यता आहे. अनेकदा अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास पंचनाम्याची प्रक्रिया ही वेळेत होत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार असते. मात्र आता यावर ई – पंचनामा प्रणाली ही उपाय ठरू शकते. याद्वारे शेतकरी स्वतः ॲपच्या माध्यमातून पंचनामा करू शकतात. याशिवाय सरकारनं बहात्तर तासांच्या आत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची अट घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता स्वतः छायाचित्रांच्या आधारे पंचनामा करता येणार आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडून सध्या महसूल विभागाच्या सेवांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी वारंवार आढावा घेतला जातोय. ही पाहणी करण्यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात अनेकदा खेटे मारावे लागत होते. मात्र ई – पीक पाहणी चा अधिकार थेट शेतकऱ्यांना देणारा उपक्रम थोरात यांनी नेटाने राबवून दाखवला. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या राज्यव्यापी समन्वयातून हा प्रकल्प आता यशस्वी देखील झाला. त्यामुळे ई -पीक पंचनामा आहे असेच अधिकार शेतकऱ्यांना मिळवून देणारी प्रणाली आणता येईल का याची चाचपणी महसूल विभागाची यंत्रणा करीत आहे.

कशी असेल प्रक्रिया?

–‘ई-पंचनामा’ प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महसूल विभागाकडून स्वतंत्र अॅप तयार केले जाणार आहे.
–जे ‘ई-पीक पाहणी’ च्या धर्तीवरच तयार केले जाणार आहे.
–नुकसानग्रस्त पिकाचे फोटो काढून गट क्रमांक व अक्षांश-रेखांशच्या नोंदी ह्या स्वतः शेतकऱ्यालाच आपल्या मोबाईलमधून ऑनलाइन सादर करावे लागणार आहे.
–तलाठ्यांना ही माहिती तपासून अंतिम मान्यता देण्याचे अधिकार दिले जाऊ शकतात. मात्र, ही प्रक्रिया कशी असेल याबाबत अधिकृत सांगण्यात आलेले नाही.

महसूलच्या कर्मचाऱ्यांनाही दिलासा

आतापर्यंत महसूल विभागाचे तलाठी तसेच कृषी विभागाचे कृषी सहायक व ग्रामसेवक यांना नियमित काम सोडून पंचनामे करण्यासाठी जावे लागत होते. पण ‘ई-पीक पाहणी’ या उपक्रमामुळे या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला होता. आता ‘ई- पंचनामा’ हा उपक्रमही प्रत्यक्षात राबवण्यास सुरवात झाली तर या कर्मचाऱ्यांचा ताण अणखीन कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांने स्वतः पंचनामा केला, त्याला तलाठ्यानी मान्यता दिली आणि ही मान्यता शासनाने गृहीत धरून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आता हे प्रत्यक्षात होण्यास अधिकचा विलंब होणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!