जमीन आणि मातीशिवाय हवेत उगवणार बटाटे; एअरोपेनिक तंत्रज्ञानाची कमाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन। बटाटा हे भाजीपाला पीक कंदमुळे या विभागात मोडते. अर्थातच ते जमिनीच्या आतमध्ये उगवते. हे आपल्याला माहित आहेच. पण बटाटे हवेतही उगवता येणार आहेत. एअरोपेनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून मातीशिवाय, जमिनीशिवाय हवेत बटाटे उगवता येणार आहेत. आणि त्यांच्या गुणवत्तेतही फरक पडणार नाही. हरियाणातील करनाळ जिल्ह्यातील बटाटा प्राद्योगिक केंद्रात ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. आणि आता या तंत्रज्ञानामुळे उत्पन्नातही १०% नी वाढ होणार असल्याचे समोर आले आहे.

हल्ली शेतीत नवनवीन प्रयोग होताना आपण पाहतच आहोत. विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी अधिकाधिक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता या नवीन तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे दिसत आहे. भारतात या तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आली आहे. बटाटा प्राद्योगिक केंद्र आणि इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर यांचा एक करार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ‘एअरोपेनिक एक आधुनिक तंत्रज्ञान असून याच्या माध्यमातून हवेत बटाट्याचे उत्पादन घेता येणार आहे. या पिकाला आवश्यक घटक हवेतून मुळापासून दिले जाता येतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येईल’ असे सिनियर कन्सल्टंट डॉ मुनीश सिंगल यांनी सांगितले आहे.

या तंत्रज्ञानामुळे मृदाजन्य रोगांपासून सुटका मिळवता येवू शकते. आणि गुणवत्तापूर्ण बियाणांची कमतरता या माध्यमातून दूर करता येवू शकणार आहे. २ कोटींच्या निधीतून एकच प्रणाली इंस्टॉल  करण्यात येणार आहे. ज्यामुळे बटाट्याच्या बियाणांची क्षमता वाढविता येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!