पोल्ट्री असोसिएशनच्या मागणीचा सोयाबीन दरावर परिणाम ? काय आहेत भाव ? जणून घ्या…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत असताना आता ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर असोसिएशन ने सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल असायला पाहिजे असे म्हणत केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. या मागणीला दोन दिवस उलटून गेले आहेत.

यापूर्वी देखील ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडस असोसिएशन यापूर्वी जीएम सोया पेंड आयातीसाठी केंद्र सरकारकडून जोरदार पाठपुरावा केला होता या संघटनेच्या लॉबिंग म्हणून केंद्र सरकारने बारा लाख टन सोया पेंड आयात करण्यास परवानगी दिली. शेतकऱ्यांचा सोयाबीन बाजारात येण्याच्या सुमारास म्हणजे ऐन हंगामात आयात सोयाबीन भारतात दाखल झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून सोयाबीनचे भाव घटले. त्यानंतर आता सोयाबीनचे दर काय आहेत यावर एक नजर टाकूया …

राज्यतील महत्वाच्या बाजारातील सोयाबीनचे सरासरी दर प्रति क्विंटल (17-11-21)

अहमदनगर कोपरगाव ६०१५, अहमदनगर राहता 5825, अहमदनगर राहुरी भांबेरी 5550, अहमदनगर संगमनेर 5550, अकोला 5550, अकोला मुर्तीजापुर 5550, अमरावती अचलपूर 4800, अमरावती धामणगाव रेल्वे 5100, औरंगाबाद पैठण 5560, बीड आंबेजोगाई 5700, बीड गेवराई 5400 ,बीड माजलगाव 5550, बीड परळी वैजनाथ 5700, बीड वडवणी 5301, बुलढाणा देऊळगाव राजा 5300, बुलढाणा मलकापूर 5260, धुळे 5550, हिंगोली बसमत 5827, हिंगोली 5775, हिंगोली कनेरगाव नाका 5400, जालना 5191, जालनाआष्टी 5500, जालना परतुर 5941 ,जळगाव 5450, लातूर चाकूर 5628, लातूर 6000, लातूर उदगीर 5830, नागपूर काटोल 5300, नागपूर सावनेर 5000 ,नांदेड भोकर 5925, नांदेड हिमायत्नगर 4950, नांदेड लोहा 5850, नांदेड मुखेड 5700 नाशिक लासलगाव 5781, नाशिक लासलगाव विंचूर 5850, उस्मानाबाद मूरिम 5275, उस्मानाबाद उमरगा 5760, परभणी गंगाखेड 5900, परभणी 5700 परभणी सेलू 5781, सोलापूर 5840, वाशिम कारंजा 5525 ,वाशिम रीसोड 5850 ,वर्धा आर्वी 5400, वर्धा हिंगणघाट 5520, वर्धा पुलगाव 5450, वर्धा सिंधी सेलू 5600, वर्धा वर्धा 5450, यवतमाळ बाभुळगाव 5300, यवतमाळ पांढरकवडा 5400.

सोयाबीनचे दर चढेच…

पोल्ट्री असोसिएशच्या मागणीनंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता असली तरी अद्याप केंद्राने असोसिएशनच्या मागणीवर निर्णय दिलेला नाही. सोयाबीनचे राज्यभरातले ताजे बाजारभाव बघता सोयाबीनच्या दरावर देखील त्याचा परिणाम सध्यातरी झालेला दिसून येत नाही. सोआयबीनच्या भावात तेजीच दिसून येत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 6000 इतका दार मिळाला आहे तर इतर बाजारसमितीमध्ये देखील सरासरी दर हे ५०००-६०००च्या दरम्यान आहेत. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांना चिंतेचे कारण नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!