राज्यात पुढील ४८ तासांत पूर्वमोसमी बरसणार , ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मराठवाड्यासह इतर काही भागांमध्ये अवकाळीने दणका दिला आहे. आणखी काही दिवस अवकाळी पावसाची हीच स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दुपारपर्यंत कडक ऊन पडत आहे तर दुपारनंतर बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग दाटून येत आहेत. तर रात्री उशिरा पाऊस हजेरी लावतो आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाचे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे दोन दिवस राज्यात हीच स्थिती असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 48 तासात राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या तीनही विभागात विजांचा गडगडाट व्हावा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.

पुढील 48 तासात पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, जालना, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्या ही राज्यातील वातावरण काही अंशी अशाच प्रकारचा असणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!