राज्यासह देशातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागांमध्ये आता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर, सांगली, अहमदनगर सह अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान आजही राज्यातल्या काही भागात माध्यम ते हालक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

लवकरच मान्सूनचे राज्यात आगमन

येत्या 27 तारखेपर्यंत केरळ मध्ये मान्सून हजेरी लावणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यात म्हणजेच कोकणात 5 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर शाखेने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील हवामान कोरडे र्ऱ्हाण्याची शक्यता आहे.

देशातील या भागात आज पावसाची शक्यता

दरम्यान देशातील इतर भागांचा विचार करता , हवामान खात्याने (IMD) आपल्या ट्विटरवर माहिती दिली आहे की, “दिल्ली-NCR आणि काही लगतच्या भागात पुढील 2 तासांत हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस आणि 50 ते 80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.” पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली साउंड मीन्स 22 आणि 23 या भागांमध्ये धुळीचे वादळ, गडगडाटासह गारांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, रायलसीमा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची

Leave a Comment

error: Content is protected !!