राज्यातल्या काही भागात विजांसह अवकाळी पावसाची हजेरी ; विदर्भात तापमानाचा पारा चढाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील चोवीस तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र कोकणचा काही भाग यांचा समावेश आहे. मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळालं. राज्यातील अकोला इथं सर्वाधिक 43.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद दिनांक 10 एप्रिल रोजी करण्यात आली आहे.

दरम्यान पुढील पाच दिवस राज्यातील विदर्भाच्या काही भागात उष्णतेची काय लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर पुढील पाच दिवस आसाम, मेघालय ,अरुणाचल प्रदेशचा काही भाग, नागालँड, मणिपूर, मिझोराम ,त्रिपुरा ,केरळ भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे. रविवारी कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर या भागाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. यावेळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच काही ठिकाणी वीज गेल्याच्या घटनाही घडल्या त्यामुळे नागरिकांना काही तास अंधारात राहावे लागले.

अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
दरम्यान काढणीला आलेल्या मका पिका सह अन्य पीक अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात असताना अचानक आलेल्या पावसाने ऊस तोडणी मजुरांची धांदल उडाली त्यामुळे काही काळ ऊस तोडणी थांबवावी लागली. याबरोबरच आंबा पिकाचे देखील अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे पॉलिहाऊस शेड उद्ध्वस्त झाल्याची देखील माहिती आहे.

येत्या काही दिवसांत, राष्ट्रीय राजधानीवर 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणारे धुळीचे वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट निर्माण होणार आहे.

कुठे किती तापमान?
दिनांक 10 एप्रिल रोजी पुणे 38.6, कोल्हापूर 34.2, महाबळेश्वर 31, मालेगाव 42.5, नाशिक 37.1, सांगली 36.1, सातारा 37.9, सोलापूर 40.2 ,मुंबई 32.8, सांताक्रुज 33.8, पणजी 33.4 ,डहाणू 35.1, औरंगाबाद 41, परभणी ३4.5 ,नांदेड 24.6, अकोला 43. 9, अमरावती 42.6, बुलढाणा 40.5, ब्रह्मपुरी 42.1 , गोंदिया 41.2, नागपूर 41.2 सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!