‘या’ बाजारसमितीत मालाच्या दर्जावरून मिळणार भाव ….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो खरंतर शेतीमालचे भाव हे शेतमाच्या प्रत आणि आवक यावर अवलंबून असतात. बाजारात शेतीमालची आवक जास्त किंवा कमी झाली तर त्यावर दर घसरणे किंवा वाढण्याचे गणित अवलंबून असते. हिंगोलीत मात्र हळदीच्या बाबतीत चांगला दर्जा असलेल्या हळदीला चांगली किंमत मिळत आहे. हिंगोलीत हळदीचे सौदे मोठ्या प्रमाणात केले जातात. आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात येथे हळद विक्रीसाठी येत असते. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचा माल घेऊन येण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेऊनच आपला माल विक्रीसाठी नेणे योग्य राहील.

यावेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतीमालासाठी मागणी आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारच्या शेतीमालाला अधिकची किंमत मिळेलच असे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा शेतीमाल आणला तरच अधिकची किंमतही मिळणार आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये माल आणण्यापूर्वीच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सचिव नारायण पाटील यांनी एका माध्यमाशी बोलताना केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!