30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन | पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या शेतीतील टरबूजाचे दुबईमध्ये निर्यात केली. आणि यातून त्यांनी लाखोंचे उत्पादन घेतले आहे.

दुबई आणि तैवान या देशात टरबूज हे फळ आवडीने खाल्ले जाते. हे ओळखून देवरवाडे यांनी नियोजन पद्धतीने टरबुजाचे पीक घेण्याचे ठरवले. त्यांनी नॉन यु सीड्स आरोही आणि विशाला या वाणाचे पीक लावले. वरतून हिरवे आणि आतून पिवळे अशा टरबूजाचे चारशे रोपे. आणि वरून पिवळे आणि आतून लाल अशा टरबुजाच्या पाच हजार रोपांची तीस गुंठे जमिनीत लागवड केली. तीन महिन्यांमध्ये हे पीक पूर्णत्वाला येऊन त्यांनी त्याची विक्री आणि निर्यात सुद्धा केली.

देवरवाडे यांनी मिश्र शेतीचा उपक्रम राबवला. यामध्ये जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा अभ्यासपूर्ण वापर केला. आणि शासकीय कृषी विभागाकडून मार्गदर्शन घेऊन उत्पन्न काढले. ‘देशातील तरुणांनी शेतीकडे दामदुप्पट करून देणाऱ्या व्यापारी दृष्टिकोनातून पाहायला हवे. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास उत्पन्न मिळवता येऊ शकते. असे मत प्रयोगशील शेतकरी श्री देवरवाडे यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

error: Content is protected !!