पावसाळ्यात वासरांचे आरोग्य जपा; योग्य वेळी परजीवींचा प्रादुर्भाव ओळखा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो पावसाळा म्हंटल की जनावरांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो मात्र तो जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांमध्ये पोटफुगीचा त्रास होतो. शिवाय पावसाळ्यात जनावरांना विविध परजीवींचा प्रादुर्भाव होत असतो. विशेषतः वासरांना परजीवींचा प्रादुर्भाव खूप लवकर होतो. या काळात त्यांची काळजी घेणे महत्वाचे असते. आजच्या लेखात याच बाबत जाणून घेऊया…

वासराच्या विष्ठेतून आणि त्या विष्ठेच्या भौतिक गुणधर्मावरून तीन प्रकारचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने टॉक्सोकॅरा व्हिटुलोरम, रक्ती हगवणआणि क्रिप्टोस्पोरीडीयम (झुनोटिक आजार) यांचा समावेश आहे.

१) टॉक्सोक्यारा व्हिटुलोरम

जन्मानंतर लगेचच वासरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा कृमिजन्य आजार आहे. कृमीची लागण वासरांना आईच्या गर्भाशयात असताना होते. जन्मानंतर वयाच्या सातव्या दिवसापासूनच हे कृमी असंख्य संख्येने आतड्यामध्ये तयार होतात. त्यांची लांबी अर्धा फुटापर्यंत असते. यांच्या वेटोळ्यांमुळे आतड्याची संभाव्य हालचाल मंदावते.

लक्षणे : आवमिश्रित हगवण, मातीच्या रंगाची रक्त मिश्रित, घाण वास येणारी विष्ठा. आतडी पूर्णपणे घट्ट झाल्यामुळे वासरांना विष्ठा होत नाही. वासरे पाठीमधून कण्हत सतत विष्ठा टाकण्याचा प्रयत्न करतात.

उपाय : वासरांना वयाच्या सातव्या दिवशी पहिली जंतनाशकाची मात्रा द्यावी

२) रक्ती हगवण (कॉक्सीडीओसिस)

वासरे, करडे आणि कोकरांनी माती चाटण्यास सुरुवात केल्यास, त्यांना या आदिजीवाची लागण होते.

लक्षणे : पातळ आवमिश्रित, रक्तमिश्रित हगवण होते.करडे आणि कोकरांमध्ये गुदद्वार आणि शेपटी सभोवतालचा पूर्ण भाग माखलेला दिसतो.

उपाय : वासरे, करडांना माती चाटण्यापासून परावृत्त करणे. गोठ्याची दैनंदिन स्वच्छता ठेवावी. वासरे, करडांना रक्ती हागवणरोधक औषधांची मात्रा पशुवैद्यकाच्या सल्याने द्यावी. उदा. अॅम्प्रोलियम इ. गोठ्यात क्षार व खनिज विटा बांधाव्यात. जेणेकरून वासरे माती ऐवजी क्षार विटा चाटतील.

३) क्रिप्टोस्पोरीडियम

गाईच्या वासरात आढळणारा रक्ती हगवण सारखा आदिजीवजन्य आजार आहे. वासरामध्ये परजीवीची लागण होते. तसेच विष्ठेद्वारे या आदिजीवाची लागण मानवास देखील संभवते.

उपाय : गोठ्याची स्वच्छता, वासरांमध्ये योग्यवेळी निदान आणि लागण झालेल्या वासरांची शुश्रूषा करावी.

वासरांचे व्यवस्थापन

वयाच्या सातव्या दिवशी प्रथम जंतनाशक औषधाची मात्रा द्यावी. वासरे, करडे,कोकरे यांचा योग्य वाळजीसह रक्ती हगवण आजार नियंत्रणासाठी उपाययोजना करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!