भाव मिळत नाही म्हणून फेकून द्यावे लागते आहे भोपळ्याचे पीक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती म्हणजे जोखमीचाच व्यवसाय असतो. शेतकरी शेतात बहुतांश गुंतवणूक करून पीक घेत असतो. पण या गुंतवणुकीच्या बदल्यात त्याचे उत्पन्न किती येईल याची मात्र शाश्वती त्याला नसते. बऱ्याचदा हवामानाच्या बदलामुळे त्याला नुकसानीस सामोरे जावे लागते तर कधीकधी पिकाला योग्य भाव मिळत नाही. येणाऱ्या सर्व नैसर्गिक आपत्तींना सामोरा जात त्याने जरी पीक घेतले तरी पिकाला भाव आला नाही तर त्याच्या पदरी निराशाच येते. साध्या भोपळा पिकाला भाव मिळत नसल्याने पिंपळगाव लेप या गावातील शेतकऱ्यांना आपले पीक फेकून द्यावे लागत आहे.

येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी सध्या त्यांचे पीक जनावरांना खायला देत आहेत. याआधी ते वेळोवेळी कांद्याची रोपे तयार करून कांद्याचे पीक घेत होते. मात्र सततच्या पावसामुळे रोपे खराब होत असल्याने त्यांनी यावेळी भोपळा हे पीक घेण्याचे ठरविले आणि ते घेतले. मात्र आता या पिकाला अगदी नाममात्र म्हणजे कॅरेटला ३० रु भाव मिळत असल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. इतक्या कमी भावात तो बाजारात घेवून जाणेही परवडत नसल्याने ते आपले भोपळे तोडून शेताच्या कडेला फेकून देत आहेत.

पिकाला भाव मिळत नसल्याने येथील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्यातील संतापही वाढतो आहे. मात्र त्यांच्या पिकाला भाव न मिळाल्याने ही आल्याचे दिसून येते आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!