पुण्यातील  संस्थेने लावला अनोख्या सोयाबीनच्या वाणाचा शोध,देईल हेक्टरी 39 क्विंटल उत्पादन 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :  शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र येथे पुणे शहरातल्या संस्थेने नवीन सोयाबीन वानाची म्हणजेच बियांची निर्मिती केली आहे.  पुणे येथील या संस्थेचे नाव आगरकर इन्स्टिट्यूट असे असून ते पुणे येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट पैकी एक आहे. जे शेतकरी लोक सोयाबीनचे पीक नियमित घेतात त्यांच्यासाठी ही बातमी जास्त फायद्याचची ठरणार आहे.

हेक्टरी 39 क्विंटल एवढे उत्पादन 

रेग्युलर सोयाबीनच्या जाती पेक्षा ही जात जास्त फायद्याचे ठरणार आहे आणि शेतकरी लोकांना जास्त नफा देनारी आहे. पुणे येथील एका संस्थेने शोध लावलेल्या सोयाबीनच्या वानाचे नाव आहे MACS 1407.पुण्यातील संशोधन संस्थेच्या काही शास्त्रज्ञांनी या वानाचा शोध लावला आहे. या जातीचे सोयाबीन लावल्यामुळे शेतकऱ्यांना  चांगला म्हणजे दर हेक्टरी 39 क्विंटल एवढे उत्पादन मिळणार आहे असा अंदाज पुण्यातील या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी म्हणजे संशोधकाने लावला आहे.

एम एस ई एस 1407 या या जातीचे बियाणे म्हणजे सोयाबीन चे वाण पुढील हंगामापासून मिळणार आहे त्यानंतर शेतकरी त्याचे उत्पादन करू शकतात. पुणे येथील आगरकर इन्स्टिट्यूट या वाणाची निर्मिती केली आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर संस्थेअंतर्गत काम करते.

कशा प्रकारे झाली वाणाची निर्मिती?

सोयाबीनच्या काही बियाण्यांच्या क्रॉस ब्रीडिंग या टेक्नॉलॉजी द्वारे या वानांची निर्मिती झाली आहे.हे नवीन संशोधित सोयाबीनचे बी म्हणजे सोयाबीन चे अनेक प्रकारचे किडे जसे की वाण गर्डर बिटल,लीफमायनर,लीफ रोलर,स्टेम फ्लाय,येफिड्स,डिफॉल्येटर्स,व्हाइट फ्लाय या कीटकांपासून संरक्षित आहे.या वानांचा शोध लावताना संशोधकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!