पुणे गारठलं …! हवेलीत किमान तापमान 10.3 अंश सेल्सिअस, जाणून घ्या तुमच्या भागातील तापमान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आता वातावरणात गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे. सकाळी धुके पडत आहे तर दिवसभर ऊन आणि कोरडी हवा वाहताना अनुभवायला मिळत आहे. राज्यातल्या बऱ्याच भागात पारा घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात देखील तापमान घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली येथे 10.3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तामापनाची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

पुणे गारठले…

हवामान तज्ज्ञ के . एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार १० नोव्हेम्बर रोजी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार पुण्यातील हवेली येथे 10.3 अंश सेल्सिअस तर पुण्यातील शिवाजीनगर येथे 11.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर हळूहळू आता रात्रीच्या वेळी जास्त थंडी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुण्यातील भोर इथं 16.2, जुन्नर 16.2 ,आंबेगाव 13, मगरपट्टा 18.8,शिवाजीनगर 11.8, इंदापूर 13.3, खेड 17.8, वडगाव शेरी 19.6, पुरंदर 15.1, राजगुरुनगर 12.4, तळेगाव 13.8 हवेली 10.3, दौंड 12.9, निमगिरी 15.2 ,गिरीवन 17.6 आणि शिरूर 11.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद पुण्यामध्ये पाहायला मिळाली आहे.

राज्यातही पारा घसरला

राज्यातल्या इतर भागातही किमान तापमानात घट होऊ लागले उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडून आल्यानंतर राज्यामध्ये गारठा वाढला. मंगळवारी दिनांक 9 रोजी निफाड येथे राज्यातील नीचांकी 12.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर आज राज्यात मुख्यतः कोरडे हवामान सह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या अनेक भागात किमान तापमान 15 अंश याच्या खाली घसरले पहाटेच्यावेळी धुके पडण्याससही सुरुवात झाली आहे. निफाड पाठोपाठ पुणे येथे काल म्हणजेच नऊ तारखेला १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल तापमान 35 . 3 अंश नोंदवले गेले आहे.

तारीख 9 रोजी सकाळपर्यंतचे किमान तापमान अंश सेल्सअस मध्ये

पुणे किमान तापमान 12.7
नगर 14.7
जळगाव 13
कोल्हापूर 18.5
महाबळेश्वर 14.1
मालेगाव 18.6
नाशिक 13.4
निफाड 12.5
सातारा 18.1
सांगली १७
सोलापूर 15
सांताक्रुज 20.2
डहाणू 21
रत्नागिरी 21.2
औरंगाबाद 13.6
नांदेड 15.9
उस्मानाबाद १६
परभणी 14.8
अकोला 15.8
अमरावती 15.3
ब्रह्मपुरी 16.2
बुलढाणा 15.6
चंद्रपूर 16.4
गडचिरोली 15.4
गोंदिया 13
नागपूर 14.4
वर्धा 14.9
वाशीम 14
यवतमाळ 14.5

Leave a Comment

error: Content is protected !!