रब्बी हंगामासाठी पंजाबराव डख यांचा महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या ८ नोव्हेम्बर पासून राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खरिपात पावसामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. मात्र रब्बीच्या पेरणीसाठी सध्याचे हवामान चांगले आहे. त्यामुळे या आठवड्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. रब्बी हंगामाबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे जाणून घेऊया …

शेतकऱ्यांसाठी सल्ला

–आठ नोव्हेंबर पासून कोरडे वातावरण राहणार आहे.
–त्यामुळे रखडलेल्या मागण्यांसाठी हे योग्य वातावरण आहे.
–12 नोव्हेंबर पर्यंत असेच कोरडे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालवतापेरण्यांची कामे सुरू करणे आवश्यक आहे.
–सोमवारपासून पाच दिवस वातावरण कोरडे राहणार आहे मात्र त्यानंतर पुन्हा चक्रीवादळाचा धोका कायम आहे.
–या वर्षी प्रत्येक दहा ते पंधरा दिवसांनी चक्रीवादळाचा धोका राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत कामे उरकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बीजप्रक्रिया महत्वाची

–दरवर्षी शेतकरी पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरुवात करतात.
–मात्र यावर्षी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी लागणार आहे.
–रासायनिक खतांची मिसळण किंवा जैविक पद्धतीने ही बीजप्रक्रिया करावी लागणार आहे.
–यामुळे हरभऱ्याला जो मर रोगाचा धोका असतो तो कमी होतो.
–त्याशिवाय या वर्षी जास्त पाऊस झाल्याने जमिनीत पाणी आहे.
–त्यामुळे बुरशीचे प्रमाणही जास्त असणार आहे.
–त्यामुळे पेरणी केलेल्या बियाला धोका होऊ नये म्हणून ही बीजप्रक्रिया महत्त्वाची आहे.

कसे असेल शेतीसाठी हवामान ?

— मराठवाडा तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात वातावरण कोरडे राहणार असून थंडीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
–झालेला अवकाळी पाऊस आणि चिभडलेली शेतजमीन यामुळे शेतकरी पोषक वातावरणाची वाट पाहत होते.
–अखेर आता पेरणीसाठी पोषक वातावरण झाले असून पेरणीचा टक्का वाढेल अशी अपेक्षा कृषी विभाग बाळगत आहे.
–हरभरा आणि गहू पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या थंडीतही वाढ होणार असल्यामुळे या आठवड्यात वेगळेच चित्र निर्माण होईल असा अंदाज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!