परभणीत शेतकऱ्यांकडून तब्बल 88.53 टन रेशीम कोषाची खरेदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम कोष खरेदी मार्केट मध्ये एक एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये एक हजार शेतकऱ्यांच्या 88. 53 टन रेशीम कोषांची खरेदी झाली आहे. शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या रेशीम कोषाची किंमत तीन कोटी 26 लाख 39 हजार 290 रुपये इतकी आहे अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली आहे.

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील रेशीम शेतीचा विस्तार झाला आहे पूर्वी या भागातील शेतकऱ्यांना रामनगरम (बंगळूरु) येथील रेशीम कोष विक्री साठी न्यावे लागतात. त्यासाठी वाहतुकीचा खर्च व तसेच वेळ लागत असे दोन वर्षांपूर्वी पुर्ण इथं रेशीम कोष खरेदी मार्केट सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांची सोय झाली आहे. चालू आर्थिक वर्षात 2021- 22 1 एप्रिल ते 31 डिसेंबर पर्यंत तीन खरेदीदार व्यापाऱ्यांनी एक हजार शेतकऱ्यांच्या 88. 53 टन रेशीम कोषांची खरेदी केली आहे.

दरम्यान पूर्ण येथील समर्थ रेशीम कोश मार्केट मध्ये मंगळवारी दिनांक अकरा रोजी रेशीम कोषाची 475 किलो आवक होती रेशीम कोषाला प्रति किलो किमान 475 ते कमाल 565 रुपये तर सरासरी दर मिळाले आहेत सोमवारी दिनांक दहा रोजी रेशीम कोषाची 750 किलो आवक असताना प्रति किलो किमान चारशे ते कमाल 580 रुपये तर सरासरी दर मिळाले आहेत. पुढील महिन्यात दरामध्ये सुधारणा होऊ शकते असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले आहे

Leave a Comment

error: Content is protected !!