नाफेड कडून रब्बी हरभऱ्याची खरेदी सुरू ; नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषि ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

केंद्र शासनाने आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने रब्बी हंगाम 2021-22 मध्ये हरभरा खरेदी करण्यासाठी 8 खरेदी केंद्र निश्चित केले आहेत. परभणी जिल्ह्यात चना खरेदीसाठी दि.16 फेब्रुवारी 2022 पासून शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. तरी शासकीय खरेदीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चना नोंदणी करुन शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी के.जे. शेवाळे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेला पिकपेरा सोबत घेवून आपल्या तालुक्यातील शासकीय खरेदी केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करावी. नोंदणीकरीता सोबत खरीप हंगाम 2021-22 मधील पिक पेरा नोंद असलेला ऑनलाईन सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक छायांकित प्रत सोबत आणावी. बँक पासबुकावर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा. असेही जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!