खुशखबर ! रब्बी हंगामाची MSP जाहीर; गव्हामध्ये 40,हरभरा 130 ची वाढ, पहा इतर पिकांच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारनं मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने 2022-23 च्या विपणन हंगामासाठी रब्बी पिकांसाठी किमान आधार मूल्य (MSP) निश्चित केले आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पिकांचे नवीन दर जाहीर करण्यात आले. यानुसार गव्हाच्या एमएसपीमध्ये 40 रुपयांनी, हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 130 आणि मोहरीच्या 400 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकार 23 पिकांची एमएसपी जाहीर करते.

उसाच्या एफआरपी वाढीच्या निर्णयावर शिक्कमोर्तब

केंद्र सरकारच्या वतीनं उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. एका क्विंटलला 290 रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे 5 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय 5 लाख कर्मचाऱ्यांना देखील याचा फायदा होईल.

सूर्यफुलाच्या किंमतीत 114 रुपयांनी वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याची माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी गव्हाच्या आधारभूत किमतीत 40 रुपयांनी, बार्लीच्या किमंत 35 रुपयांनी, हरभऱ्याने 130 रुपयांनी, मसूर आणि मोहरीने 400 रुपयांनी आणि सूर्यफूलच्या किमतीत 114 रुपयांनी वाढ केली आहे. आज पुन्हा एकदा रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!