पुढील ५ दिवस मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पहिल्या पावसातच मुंबईची दैना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असतानाच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुंबईमध्ये पुढील ५ दिवस आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवस मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मान्सून विदर्भसाहित संपूर्ण संपूर्ण राज्य व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.  मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून या संदर्भातली माहिती दिली आहे.

मुंबई उपनगरात आज पुन्हा सकाळपासून पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने 9 ते 13 जून दरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

या वर्षीच्या पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. लोकल ट्रेन्स वरती देखील याचा परिणाम झाला त्यामुळे ट्रेन रद्द करण्यात आलया. मुंबईतील सायन, किंग्स सर्कल, हिंदमाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलयाच्या घटना दिसून आल्या. काल झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.बुधवारी चेंबूर 280.52 मिमी, मानखुर्द, गोवंडी – 248.52 मिमी, घाटकोपर – 21022 मिमी तर कुर्ला परिसरात 231.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंधेरी (पूर्व) 271.76 मिमी, मालवणी 253.88 मिमी, गोरेगाव 217.36 मिमी, अंधेरी ( प.) 215.03 मिमी, दहिसर 208.22 मिमी, सांताक्रूझ 207.64 मिमी, वर्सोवा 207.44 मिमी, वांद्रे 86.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!