राज्यात आजपासून पावसाची उघडीप ; बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषि ऑनलाईन : राज्यातलया विविध भागात सुरु असलेला पाऊस आजपासून उघडीप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या भागात आतापर्यंत मुसळधार पाऊस होत होता त्या भागाला काहीसा दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. असेच वातावरण पुढच्या पाच दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील ५ दिवस राज्याकरिता कोणतीही चिथावणी हवामान विभागाकडून जारी करण्यात आली नाही.

बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता

भारतीय हवामान खात्याच्या हवल्यानुसार हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबर 2021 रोजी उत्तर बंगालच्या उपसागरावर एक चक्रीवादळ परिसंचरण विकसित होण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसात ते पश्चिम-वायव्य दिशेने ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तर मध्य प्रदेशच्या मध्य भागांवर आणि कमी दाबाचे क्षेत्र चांगले चिन्हांकित केले आहे.
संबंधित चक्रीवादळ अभिसरण कायम आहे पुढील 48 तासांमध्ये ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे. अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. मात्र जर हे वादळ विकसित झाले तर राज्यातील वातावरणावर त्याचा काय परिणाम होईल याची माहिती अद्याप देण्यात आली नाही.

 

Leave a Comment

error: Content is protected !!