शेतकऱ्यांनो दोन दिवस पावसाचेच …! काढलेल्या पिकाची अशी घ्या काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्यात पुन्हा एकदा आठही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या काही ठिकाणी खरिपाच्या काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी काही ठिकणी काढणी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत पावसाने पुन्हा खोडा घातल्यामुळे पदरात पडलेले पीक बाजरपेठेपर्यंत सहीसलामत जाणे महत्वाचे आहे आताच्या पावसामुळे धान्याला बुरशी लागण्याची अधिक संभावना असते त्यामुळे अशा पिकाची काळजी कशी घ्यावी याची माहिती घेऊया …

पुन्हा पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढचे २-३ दिवस पुन्हा मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्याचा विचार करता या भागात मेघगर्जना , वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे काढणी झालेल्या धान्याची चांगल्या प्रकारे साठवणूक होणे गरजेचे आहे. कारण अशा वातावरणात काढणी केलेल्या धान्याला बुरशी लागण्याचा धोका असतो. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद याची काढणी केली की ते सुखावून ठेवणे गरजेचे आहे. सध्या पावसाचे दिवस असले तरी या दरम्यान पिकांची काळजी घेतली तरच उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

काय घ्याल काळजी

–काढलेले सोयाबीन एकत्रच साठवून न ठेवता उन्हामध्ये किंवा कोरड्या वातावरणात सुखावणे गरजेचे आहे.
–आजही शेतकरी हे पावसाचा परिणाम होऊ नये म्हणून एकाच जागी साठवणूक करुन ठेवतात.
–यामुळे शेंगाला बुरशी लागण्याचा धोका संभावतो.
–त्यामुळे सोयाबीन वाळवूण पुन्हा त्याची गंज लावली तरी पिकाचे नुकसान हे टळणार आहे.
— पावसाने उघडीप दिल्यास यंत्राच्या सहाय्याने त्वरीत काढणी कामे उरकून घेणे आवश्यक आहे.
–शेतकऱ्यांनी शेती कामे उरकून धान्य हे कोरड्या जागेत ठेवणे गरजेचे आहे.

असे करा पिकाचे व्यवस्थापन

पावसाची शक्यता असेल तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच त्याचे खळे करणे आवश्यक आहे. कारण काढणीनंतर जर पाऊस झाला आणि सोयाबीन, उडीद हे भिजले तर मालाचा दर्जाही ढातळतो आणि पिकाची उगवणही होण्याचा धोका संभावतो त्यामुळे पावसाचे वातावरण असेल तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की, लागलीच यंत्राच्या सहाय्याने पिक पदरात पाडून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागले तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी हे गरजेचे आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!