हॅलो कृषी ऑनलाईन : ‘यास’ चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर झाला नसला तरीही त्याचा प्रभाव मात्र राज्यातील काही भागात पाऊस पडतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील कच्चा घरांचं शेती पिकांचे तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
जिल्ह्यातील पैठण, खुलताबाद, पाचोड परिसराला सर्वाधिक फटका बसलाय. पळसवाडी, चित्तेपिंपळगाव, गल्लेबोरगाव, वैजापूर, मनोर येथे जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. महिन्याच्या अगोदर जरी पाऊस पडला असला तरीही शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये जूनच्या पहिल्या आठवड्यात नंतर पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे असे आवाहन कृषी अधिकारी हर्षदा जगताप यांनी केलाय.
शेतकऱ्यांचे या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने पिकांना ही मोठा फटका बसलाय. अनेक ठिकाणच्या बागेमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.चितेपिंपळगाव परिसरात पावसाने गुरुवारी पाचच्या सुमारास हजेरी लावली. जवळपास अर्धा-पाऊण तास धो धो पाऊस बरसला. वेरूळ परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे या परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने परिसरातील मलकापूर चिंचोली माटेगाव अधिक आवाजात सुरू असलेल्या खरीप हंगामाची काम आणि मशागतीची कामे मात्र खोळंबली.