राज्यात आजपासून 4 दिवस पुन्हा पाऊस …! पहा केव्हा आणि कुठे बरसणार सरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ मराठवाड्यात काही दिवसांपुरवी झालेल्या गारपीट आणि नुकसानीतून अद्यापही शेतकरी सावरला नाही तोपर्यंत पुन्हा एकदा राज्यात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आजपासून (६)ते ९ जानेवारीपर्यंत राज्यातल्या काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ,विदर्भात पावसाचा अंदाज आहे. शनिवार पासून म्हणजे दिनांक ८ पासून विदर्भात विजा मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता असून रविवारी दिनांक 9 रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावर बाष्प

पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पाचा पुरवठा पूरक ठरल्याने वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये विजा, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणार असून राज्यात ढगाळ हवामान होत आहे गारठा कमी झाला आहे आज दिनांक ६ रोजी उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता तर उद्यापासून(७) उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रविवार दिनांक ९ रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातला इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात वाढ होतेय. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 12 ते 20 अंशांच्या दरम्यान तर कमाल तापमान 28 ते 34 अंशांच्या दरम्यान आहे. बुधवारी दिनांक 5 रोजी विदर्भातील गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथे राज्यातील नीचांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 33.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.

केव्हा आणि कुठे पाऊस लावणार हजेरी

राज्यात 6 – 9 जानेवारी दरम्यान काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस:
6 -धुळे,नंदुरबार
7 -धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर
8 -ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग
9 -मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग

Leave a Comment

error: Content is protected !!