येत्या पाच दिवसात राज्यात पावसाचा इशारा तर अरबी समुद्रात चक्रीवादळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या पश्चिमेला असणार्‍या आरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनार पट्टीला बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. पण पुढील एक-दोन दिवसात समुद्रातील हवेची दिशा बदलून हे वादळ व ओमानकडे सरकेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या सॅटॅलाइट इमेजनुसार आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दक्षिणपूर्व अरबी समुद्र कोमोरीन , मालदीव आणि लक्षद्वीप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग दाटले आहेत. त्याच परिसरात 16 मे रोजी चक्रीवादळ निर्माण होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या वादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसला तरी परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसाच अरबी समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटींना आज रात्रीपर्यंत किनारपट्टीवर येण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

तूर्तास राज्यावरील चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी राज्यात पुढील पाच विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह वेगवान वारा यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. येत्या 14 ते 16 मे दरम्यान तीन दिवसात कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. त्याचबरोबर 16 मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना मुंबई वेधशाळेनं सतर्क राहण्याचा इशारा जारी केला 16 मे रोजी या दोन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पाऊस पडत असताना घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत नोंद घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे त्या व्यतिरिक्त उत्तर आणि दक्षिण गोव्यातील पुढील तीन ते चार दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान या ठिकाणी 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने होऊ शकतो.

 

Leave a Comment

error: Content is protected !!