कमी खर्चात होईल जास्त कमाई ! मेंढीपालन करा,केंद्र सरकारकडून मिळते 50 टक्के अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या ग्रामीण भागात लोकर, खत, दूध, चामडे यांचा व्यवसाय वेगाने फोफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मेंढीपालनाची लोकप्रियता वाढली आहे. शेतकऱ्यांना मेंढीपालन व्यवसायाकडे प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जात आहे.

कमी खर्चात सुरू करा मेंढीपालन

गाय, म्हैस, शेळी यांच्या तुलनेत मेंढीपालन अतिशय सोपे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या आहारावर फारसा खर्च करावा लागत नाही. शाकाहारी असल्याने मेंढ्या मुख्यतः गवत किंवा हिरव्या पानांवर अवलंबून असतात. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मेंढीपालनासाठी केंद्र सरकारकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. तज्ज्ञांच्या मते, शेतकरी केवळ एक लाख रुपये खर्च करून आपला व्यवसाय सुरू करू शकतो. बाजारात एक मेंढी तीन ते आठ हजार रुपयांना विकली जाते.

मेंढीपालनाचे फायदे

मेंढीपालन हे ग्रामीण भागातील उत्पन्नाचे प्रमुख साधन बनत आहे. त्यामुळे लोकर, मांस, दूध, चामड्याचा व्यवसाय झपाट्याने वाढला आहे. मेंढीचे शेण हे शेतासाठी अतिशय चांगले खत मानले जाते. शेणखताने शेताची उत्पादकता बर्‍याच प्रमाणात वाढवता येते.

हिवाळ्यात मेंढीपालकांचे उत्पन्न वाढते

मेंढीच्या शरीरावर खूप मऊ आणि लांब केस असतात, ज्यापासून लोकर मिळते. त्याच्या लोकरीपासून अनेक प्रकारचे कपडे बनवले जातात. महाराष्ट्राचा विचार करता मेंढीच्या केसांपासून घोंगडे, जमखाने बनवले जातात. थंडीपासून बचावासाठी त्याचा आजही वापर केला जातो. अशा परिस्थितीत हिवाळ्यात मेंढीपालकांचे उत्पन्नही अनेक पटींनी वाढते. अशा परिस्थितीत चांगला नफा मिळवण्यासाठी शेतकरी एका मेंढीचा वापर अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी करू शकतात. शेळीपालनापेक्षा मेंढीपालनातील नफा कितीतरी पटीने अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!