राजापुरी हळदीला मिळाला १७ हजाराचा उच्चांकी भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद सौद्यामध्ये कर्नाटकातील कडट्टी येथील शेतकरी आण्णाप्पा महावीर मन्नोजी यांच्या राजापूरी हळदीला क्विंटलला 17 हजार 100 असा उच्चांकी भाव मिळाला. हळद काढणी जोमात सुरु असल्याने मार्केट यार्डात मोठी आवक होत आहे. क्विंटलला 7 ते 17 हजारापर्यंत दर मिळत आहे.

जानेवारी महिन्यांमध्ये जिल्ह्याल हळदीचा हंगाम सुरु झाला. त्यानंतर हळदीचे सौदे सुरु झाले असून मार्केट यार्डात हळदीची आवक वाढू लागली आहे. बुधवारी निघालेल्या सौद्यामध्ये कडट्टी येथील शेतकरी आण्णाप्पा महावीर मन्नोजी यांच्या राजापूरी हळदीला क्विंटलला 17 हजार 100 असा उच्चांकी भाव मिळाला. ही हळद संतगोल ट्रेडींग कपंनी या दुकानात अर्जुन अट्टल यांनी खरेदी केली आहे.

हळद सौद्यामध्ये क्विंटलला कमीत कमी 7 हजार व जास्तीजास्त 17 हजार 100 रुपये इतका दर मिळाला आहे. सांगलीची हळद पेठ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश, बेळगाव, विजापूरसह शेजारच्या सीमाभागातील हळद सांगली बाजार समितीकडे विक्रीसाठी येते. डिसेंबर महिन्यांपासून हळद काढणीला सुरुवात होते. जानेवारीच्या पंधरावड्यानंतर बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना सुरुवात केली होती.

Leave a Comment

error: Content is protected !!