सांगलीत राजापुरी हळदीला मिळाला उच्चांकी 18 हजार रुपये दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगलीतील मार्केट यार्डात बुधवारी झालेल्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला 18 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. बावची येथील विजयकुमार चव्हाण यांची ही हळद आहे. भाव चांगला मिळाल्याने शेतकर्यांमधुन समाधान व्यक्त आहे. मार्केट यार्डात हळदीची आवक-जावक चांगली आहे. वाळवा तालुक्यातील बावची येथील विजयकुमार चव्हाण या शेतकर्याच्या हळदीला बुधवारी झालेल्या सौद्यात क्विटंला 18 हजार रुपये दर मिळाला.

हळद सौद्यामध्ये क्विटंला कमीत कमी 6 हजार आणि जास्तीत जास्त 18 हजार व सरासरी 12 हजार रुपये असा दर मिळाला आहे. येथील मार्केट यार्डात हळद खरेदीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येत आहेत. परिणामी हळदीस चांगला दर मिळतो आहे. यामुळे शेतकर्यांना चार पैसे मिळू शकणार आहेत.

त्यामुळे हळद उत्पादक शेतकर्यांनी आपली हळद जास्तीत जास्त विक्रीसाठी बाजार समितीमध्ये घेऊन यावे, असे आवाहन सभापती दिनकर पाटील, सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे. तसेच चालू हळद आणि बेदाणा या शेतीमालावर शासनाची तारण कर्ज योजनाही सुरू आहे, त्यांचा लाभ घ्यावा, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/01/2022
मुंबईलोकलक्विंटल18990001500012000
05/01/2022
भोकरक्विंटल4650968096660
हिंगोलीक्विंटल8009000100009500
मुंबईलोकलक्विंटल16690001500012000
सांगलीराजापुरीक्विंटल19560001800012000

Leave a Comment

error: Content is protected !!