थकीत एफआरपी प्रकरणी राजू शेट्टी आक्रमक ! पुन्हा छेडणार आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

राज्यात मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भांत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. राज्यात आज 23 जिल्ह्यात जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टी व महापूरामुळे नष्ट झालेली आहेत. तरी अद्यापही सरकारने मदत जाहीर केलेली नाही. अनेक जमिनी वाहून गेलेल्या असून विहीरी कोसळल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आजही 1 हजार 530 कोटीची एफआरपी थकीत आहे, याबाबत शासनाने ठोस कार्यवाही न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

कराड तालुक्यातील खोडशी येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारणीच्या बैठक प्रसंगी त्यांनी ‘हॅलो कृषी’ सोबत संवाद साधला. यावेळी रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष  संदीप जगताप, प्रा. जालिंदर पाटील, सावकार मदनाईक, देवानंद पाटील यांच्यासह राज्यातील संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व स्वतंत्र निवडणुका लढविणार

आम्हांला स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून जिथे- जिथे निवडणुका लढणे शक्य आहे, तिथे स्वतंपणे उमेदवार उभे केले जातील. आम्ही आज निवडणुका सत्ता प्राप्तीसाठी नव्हे, तर राजकारण एवढे गलिच्छ झाले आहे. सर्वसामान्य माणसाला राजकारणाचा वीट आला आहे. प्रस्थापित सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मनातून उतरलेले आहेत. अशा परिस्थिती स्वच्छ, कार्यक्षम व बुध्दीवादी चेहरा देण्याचा प्रयत्न राहील, असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले

Leave a Comment

error: Content is protected !!