महापुरावर तोडगा काढण्यासाठी राजूशेट्टी यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना सांगितला ‘हा’ पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. दक्षिण महाराष्ट्र जिल्ह्यातील महापौरांची वाढती समस्या लक्षात घेता. अलमल्ली धरणाची ऊंची वाढवू नये, या मागणीसाठी या भेटीचे नियोजन करण्यात आले होते. अलमल्ली धरणाची ऊंची वाढविण्यात आली तर त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत याची माहिती देत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली.

यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले की, कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. त्यामुळे पूराच्या दरम्यान, लगतच्या भागात दोन-दोन किलोमीटर पाणी हे पसरते. शिवाय अत्यंत मंद गतीने या भागातील पाणी हे कमी होते. त्यामुळे बेळगाव व दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील महापूरावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुशंगाने ऑगस्टपर्यंत पाणीतातळी ही 512 मीटरवर ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा या भागात पाणी साचून राहिल्याने शेतीपिकाचे तर नुकसान होणारच आहे. शिवाय लगतच्या गावांनाही धोकी राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी

सध्या कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे 6 पूल, हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील 5 पूल व दुधगंगा – वेदगंगा नदीवरील पूलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत आहेत. तर चिकोडी तालुक्यांतील अंकली – मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकंणगले , चिकोडी व निपाणी तालुक्यांतील पुरस्थिती गंभीर होत आहे. यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणांची उंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी केली. यावेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा, खासदार आण्णासाहेब ज्वोले, आमदार संजय पाटील, आमदार कल्लाप्पाणा मग्यान्नावर, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर आदी उपस्थित होते.

अलमल्ली धरणाची ऊंची वाढविण्याबाबतचा अहवाल हा केंद्रीय जल आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. महापूर नियंत्रणाबाबत अभ्यासगटाची नेमणूक होणार आहे. शिवया या आयोगाचा अहवाल आल्यानंतर मंत्रालयात होणाऱ्या बैठकीस राजू शेट्टी यांना निमंत्रित करु असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.अलमल्ली धरणाची ऊंची वाढवली तर दक्षिण महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यात महापूराचे पाणी हे साठून राहणार आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा, वैदगंगा व हिरण्यकेशी या नद्यावरील पुलाचा पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याचा पर्याय राजू शेट्टी यांनी बैठकी दरम्यान समोर ठेवला होता.

Leave a Comment

error: Content is protected !!