हंगामाच्या अंतिम टप्प्यात तुरीचा बोलबाला, साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची चांदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्याचे तुरीचे दर पाहता तुरीच्या भावात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हंगामाच्या शेवटी तुरीला मिळणाऱ्या दराने सोयाबीनला देखील मागे टाकले असून सध्या तुरीला ८५०० क्विंटल भाव मिळत आहे. एव्हढेच नव्हे तर पुढे देखील तुरीचे दर चढेच राहणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात घसरण ही सुरुच आहे. 7 हजार 300 वर गेलेले सोयाबीन आता 6 हजार रुपये क्विंटल असे विकले जात आहे.

संपूर्ण हंगामात 6 हजार 300 या हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळालेला नव्हता. अखेर नाफेडची केंद्र बंद झाली तरी दरातील घसरण सुरुच होती. शिवाय तुरीची आयात सुरु असतानाही दर वाढले हे विशेष. वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे तुरीच्या दरात वाढ होत आहे. गेल्या महिन्यात तुरीचे दर हे 7 हजार 500 होते तर आता 8 हजार 500 येऊन ठेपले आहेत.

साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची चांदी

खरीप हंगामातील तुरीची काढणी होताच राज्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असाच दर ठरवून देण्यात आला होता. खरेदी केंद्रावरील आणि बाजारपेठेतील दर हे सरासरीपेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांनी तूर साठवणुकीवर भर दिला गेला होता. ज्या शेतकऱ्यांना साठा करुन ठेवला त्या शेतकऱ्यांची आता चांदी होत आहे. तब्बल 2 हजाराहून अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/08/2022
कारंजाक्विंटल370740085008050
मंगळवेढाक्विंटल1601060106010
मोर्शीक्विंटल51730075507425
लातूरलालक्विंटल889670088008000
अकोलालालक्विंटल1006630083357755
यवतमाळलालक्विंटल17730078007550
मालेगावलालक्विंटल23400069996000
चिखलीलालक्विंटल15605175016776
नागपूरलालक्विंटल256720081527914
वाशीमलालक्विंटल600760085008000
चाळीसगावलालक्विंटल3698071997000
मलकापूरलालक्विंटल273700086307900
दुधणीलालक्विंटल355800085308300
माजलगावपांढराक्विंटल40650079507700
बीडपांढराक्विंटल43649179617425
गेवराईपांढराक्विंटल49580078017600

Leave a Comment

error: Content is protected !!