सोयाबीनच्या फुले संगम वाणाचे विक्रमी प्रति हेक्‍टर 35.72 क्विंटल उत्पादन; 9 हजार दराने विक्री केले बियाणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा तालुका सेनगाव येथील प्रगतिशील शेतकरी राहुल दत्तराव कव्हर यांना गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करून सोयाबीनच्या फुले संगम के डी एस 726 या वाणाचे विक्रमी म्हणजे प्रति हेक्टर 35. ७२ क्विंटल म्हणजे एकरी 14. 28 क्विंटल एवढे उत्पादन मिळवले आहे.

राहुरी विद्यापीठ कडून विकसित बियाणे
तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र आणि बायफ संस्था यांच्यातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत समूह पंक्तीत पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम यामध्ये ताकतोडा तालुका सेनगाव या गावाची निवड करण्यात आली. या गावाची सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता सरासरी 14 क्विंटल होती.उत्पादकता वाढीसाठी या गावातील 25 शेतकऱ्यांची निवड करून कृषी विज्ञान केंद्रामार्फत निवड करण्यात आली. त्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीनचे नवीन वाणके डी एस 726 फुले संगम प्रत्येकी 30 किलो बियाणे प्रात्यक्षिक करिता देण्यात आले.

मशागत
कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाचा अवलंब करून राहुल दत्तराव कव्हर यांनी यंदाच्या एप्रिल महिन्यात खोल नांगरणी केली वखराच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केली.

बीजप्रक्रिया
सोयाबीन बियाण्यास शिफारसीनुसार ट्रायकोडर्मा, रायझोबियम व पीएसबी ची बीजप्रक्रिया केली माती परीक्षणावर आधारित शिफारशीनुसार असे खतांच्या मात्रा दिल्या गादीवाफ्यावर टोकन पद्धतीचा अवलंब केला.

लागवड
बेडचा टॉप हा 60 सेंटिमीटर ठेवला त्यावर 60 बाय 15 सेंटिमीटर अंतरावर झिग पद्धतीने 16 जून रोजी सोयाबीन बियाण्याची टोकण पद्धतीने लागवड केली त्याकरिता त्यांना 28 गुंठे 14 किलो बियाणे लागले. एकरी झाडांची संख्या 81 हजार 666 ठेवली. तर नियंत्रण मशागती या पद्धतीने करून सुरुवातीपासूनच रोग आणि किडी वर प्रभावी नियंत्रण केले. त्याकरिता निंबोळी अर्क तसच शिफारशीत कीटकनाशकांचा वापर केंद्राच्या मार्गदर्शनात त्यांनी केला.

नऊ हजार रुपये दराने बियाणे विक्री
कव्हर यांना 28 गुंठे क्षेत्रावर दहा क्विंटल म्हणजे 40 गुंठे प्रति एकर क्षेत्रावर 14.8 28 क्विंटल उत्पादन मिळाले. या उत्पादनांमध्ये त्यांनी साडेचार क्विंटल बियाण्याची नऊ हजार रुपये दराने विक्री केली. समूह पंक्ती प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागी अन्य शेतकऱ्यांनी सुद्धा उत्साहवर्धक उत्पादन घेतले. जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता नऊ पॉईंट 86 क्विंटल असताना सरासरी पंचवीस पॉईंट वीस क्विंटल अधिक उत्पादकता मिळाली. उत्पादन खर्चात 25 टक्के बचत करून एकूण 38 पॉईंट 78 टक्के जास्त उत्पादन घेण्यात आले कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर पीपी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक कृषी तंत्रज्ञान ताकतोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचवले जात आहे.

संदर्भ : ऍग्रोवन

Leave a Comment

error: Content is protected !!