पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवार पासून राज्यातील अनेक भागात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक ते माध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. पुणे-सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागाने आजच्या दिवशी रेड अलर्ट दिला आहे. दुसरीकडे उद्या म्हणजेच 18 जूनला पुणे, सातारा कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार तासात मुंबई, नवी मुंबई, सातारा आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सातारा,पुणे, रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, जालना बीड उस्मानाबाद आणि लातूर ला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.19 आणि 20 जून ला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात मागील चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील 13 धरण तुडूंब भरली आहेत. तर नऊ धरणांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक पाण्याचा संचय झाला आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात 432 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे

Leave a Comment

error: Content is protected !!