लाल कांद्याची बाजारात दोन आठवडे आगोदरच एंन्ट्री, पहा किती मिळाला दर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशकात मोठ्या परिमाणात कांदा या पिकाचे उत्पादन घेतले जाते. एकीकडे मराठवाड्यात हिवाळा कांदा लागवडीची लगबग सुरु असताना बाजारात लाल कांदा बाजारात आला सून त्याला चांगला दर देखील मिळाला आहे. चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील शेतकऱ्यांचा लाल कांदा हा दोन आठवडे आगोदरच देवळा येथील बाजारात दाखल झाला आहे. मुहुर्ताचा कांदा म्हणून याची खरेदी करण्यात आली. यात कांद्याला 3131 रुपये दर मिळाला आहे.

दर हे चढेच राहणार

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, मालेगाव, येवला, देवळा व सिन्नर तालु्क्यात कांद्याचे विक्रमी उत्पन्न घतले जाते. खरीपात लागवड केलेल्या कांद्याची ऑक्टोंबरमध्ये आवक सुरु होते. कौतिक जाधव यांच्या या कांद्याला 3131 रुपये असा दरही मिळाला. हा मुहुर्त दर असला तरी भविष्यातही दर हे चढेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. कौतिक जाधव यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यातच दोन एकरावर या कांद्याची पेरणी केली होती. कांदा पेरणी करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. कांदा हा मध्यम स्वरुपाचा असताना त्याला योग्य दर मिळाला नसल्याने त्यांनी कांद्याची काढणी ही केलीच नाही. जाधव यांनी तीन वेळा फवारणी केली शिवाय कोंबडी खत आणि युरियाची मात्रा दिल्याने कांद्यात सुधारणा झाली. आता दोन एकरातील कांद्याची काढणी ही झाली आहे. मध्यंतरीच्या पावसामुळे थोड्याप्रमाणात नुकसान झाले असले तरी आता या लाल कांद्याली 3131 दर मिळाला आहे.

25 क्विंटल कांद्याचे 78 हजार रुपये

दरेगाव येथील कौतिक जाधव यांना 25 क्विंटल 40 किलो कांदा हा दोन एकरामध्ये झाला होता. शिवाय काढणीच्या प्रसंगी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले होते. मात्र, चांगल्या अवस्थेतील कांद्याला 3131 रुपयांचा दर मिळाला. हा मुहुर्ताचा दर असला तरी चांगल्या प्रतिच्या कांद्याला दर कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. या काद्यातूनच जाधव यांना 78 हजार रुपये पदरी पडलेले आहेत.

 

Leave a Comment

error: Content is protected !!