आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनच्या दरात घट ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आजच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनचे दर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. दिनांक 19 मार्च रोजी सोयाबीनला कमाल भाव सात हजार चारशे रुपये मिळाला होता. मात्र आजचे बाजार भाव पाहता आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7350 इतका भाव मिळाला आहे. तर राज्यातल्या बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे कमाल दर हे सात हजार शंभर ते सात हजार रुपयांपर्यंत आले आहेत.

आज (२१) सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सर्वाधिक 7350 इतका दर मिळाला आहे. आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 51 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 7150 सर्वसाधारण भाव 7150 आणि कमाल भाव 7350 रुपये प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. त्या खालोखाल जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कमाल सात हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला तर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 291 रुपयांचा भाव मिळाला आहे तर तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार शंभर, कारंजा 7160, राहता 7120, सोलापूर 7150 असे कमाल दर मिळाले आहेत. तर राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण दर हे सहा हजार दोनशे ते सात हजार 127 रुपयांपर्यंत आहे.

लातूरात आणखी 3 सोयाबीन प्लांट उभारणार

शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एकाच वेळी तीन सोयाबीन प्लांट सुरू होणार आहेत. लातूर ही सोयाबीनची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. आता त्यामध्ये उदगीरचा समावेश होणार आहे आणि शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ येथे मिळणार आहे. पुढील हंगामापासून सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारपेठेत सोयाबीन विक्री करण्याऐवजी थेट सोयाबीन प्लांट ला विक्री करतील असं चित्र सध्या तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. उदगीर तालुक्यात बामणी, पाटी ,करडखेल पाटी व उदगीर शहराजवळ नाळेगाव रस्त्यावर सोया प्लांट उभारले गेले आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 21-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2022
माजलगावक्विंटल123560069006751
संगमनेरक्विंटल2694069406940
कारंजाक्विंटल4000671071607025
तुळजापूरक्विंटल215685071007000
राहताक्विंटल22700171207086
सोलापूरलोकलक्विंटल54470071506970
अमरावतीलोकलक्विंटल2997635069756662
हिंगोलीलोकलक्विंटल490683072917060
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल10640069006800
मेहकरलोकलक्विंटल950620071656800
जालनापिवळाक्विंटल1518510072007000
अकोलापिवळाक्विंटल664620070306650
परभणीपिवळाक्विंटल80680070006950
मालेगावपिवळाक्विंटल28431169696700
चिखलीपिवळाक्विंटल430645070606755
बीडपिवळाक्विंटल146590069516816
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल263680070006900
जिंतूरपिवळाक्विंटल18698070006980
गंगाखेडपिवळाक्विंटल51715073507150
देउळगाव राजापिवळाक्विंटल35650070007000
गंगापूरपिवळाक्विंटल8590066006575
उमरगापिवळाक्विंटल4700071007000
बसमतपिवळाक्विंटल771670072757127
सेनगावपिवळाक्विंटल325640071506800
पुर्णापिवळाक्विंटल17665070227000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल360620065006300
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल130500070006200

Leave a Comment

error: Content is protected !!