PM Fasal Beema Yojana : पोस्ट ऑफिसमधून होणार प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी नोंदणीची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. या तारखेच्या आत शेतकऱ्यांना (PM Fasal Beema Yojana) आपली सर्व माहिती देऊन नोंदणी करणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये होणाऱ्या नुकसान भरपाई देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आता या योजनेची नोंदणी जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस मधून सुद्धा करता येणार आहे. याबाबतची माहिती सातारा मंडळ टपाल विभागाचे वरिष्ठ प्रवर अधीक्षक व्यंकटेश रेड्डी यांनी दिली आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील 150 शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केल्याची माहिती देखील रेड्डी यांनी दिली आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले, प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी बँक पासबुक, सात बारा, आधार कार्ड इत्यादी कागदपत्र सोबत अन्न आवश्यक आहे. सातारा डाक विभाग जिल्ह्यातील (PM Fasal Beema Yojana) सर्व जनतेला विविध शासकीय योजना घरपोच देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सातारा विभागीय कार्यक्षेत्रात 384 पोस्ट ऑफिस असून ही सुविधा शासकीय माफक दरामध्ये उपलब्ध आहे याबरोबरच पोस्ट ऑफिस मध्ये सीएसटी प्लॅटफॉर्म मधून सर्व प्रकारची बिल, पेमेंट गॅस बुकिंग, विमान, रेल्वे बस तिकीट आरक्षण, पॅन कार्ड आवेदन, विमा पॉलिसी यासारख्या लागणाऱ्या सुविधा सुद्धा टपाल कार्यालयात उपलब्ध आहेत.

अंतिम तारीख 31 जुलै

प्रधानमंत्री पिक विमा योजने साठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. ते म्हणाले पंतप्रधान पिक विमा योजनेची नोंदणी करताना शेतकरी बांधवांनी आपला पिक विमा काढून घ्यावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळू शकेल. यासाठी सातारा विभागातील सर्व टपाल कार्यालयात प्रधानमंत्री पिक विमा योजना नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या हंगामातील पिक विमा नोंदणीची शेवटची तारीख 31 जुलै असल्यानं त्या अगोदरच नोंदणी करून शेतकऱ्यांनी सहकार्य करावं. असं रेड्डी यांनी शेतकऱ्यांसाठी (PM Fasal Beema Yojana) सांगितलं आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारी जमीन आणि पिकं याची परिस्थिती पाहून त्या त्या पिकानुसार आणि जमिनीच्या कार्यक्षेत्रानुसार संबंधित शेतकऱ्यांना विमा योजनेची रक्कम निश्चित केली जाईल असंही रेड्डी यांनी स्पष्ट केलं

Leave a Comment

error: Content is protected !!