नाबार्डच्या संभाव्य कर्ज आराखड्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन ; परभणीसाठी 4 हजार 656 कोटी रुपयांचा आराखडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यासाठी नाबार्डच्या संभाव्य सन २०२२-२३ आराखड्याचे विमोचन १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले .या आराखड्यानुसार जिल्ह्यासाठी एकुण ४ हजार ६५६ कोटी रुपयाचा संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे . आराखड्याच्या विमोचन प्रसंगी नाबार्डचे जिल्हा विकासप्रबंधक पी . एम . जंगम , जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुनिल हट्टेकर , महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उपमहाप्रबंधक गिरीष बेंद्रे , आरसेटी संचालक पांडुरंग निनावे , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर . कुरुंदकर यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाच्या बँकांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

. नाबार्डच्या संभाव्य कर्ज आराखड्यात सन २०२२ -२३ साठी २ हजार ४४४.९ कोटी रुपयाचे पीक कर्ज निश्चित करण्यात आले आहे तसेच शेती मधिल मुदत कर्जासाठी ४३७.५६ कोटी रुपयाचा संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. शेतीसह शेतीपुरक कर्ज तसेच एमएसएम इत्यादी शैक्षणिक कर्ज , गृह कर्ज , अक्षय उर्जा आदी प्राथमिक क्षेत्रातील सर्व परभणी जिल्हयासाठी एकुण ४ हजार ६५६.४३ कोटी रुपयाचा घटकाकरीता संभाव्य आराखडा करण्यात आला आहे . यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सर्व बँक प्रतिनिधींना दिलेल्या लक्षांका नुसार वेळेत कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत .

Leave a Comment

error: Content is protected !!