ड्रॅगन फ्रुटचंही नामांतर! आता कमळ या नावाने जाणार ओळखले; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन। सध्या बाजारात उपलब्ध असणारे आणि आरोग्यदायक फळ म्हणून ड्रॅगन फ्रुट हे परदेशी फळ चांगलेच प्रसिद्ध आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते. या फळाचे नाव आता भारतात कमळ असे ठेवण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी हे नामकरण केले असून इथून पुढे या फळाला कमळ असे संबोधण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.

मूळ मेक्‍सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई देश आदी ठिकाणी केली जाते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते.ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक फळपीक झाले आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस (Hylocereus) ही त्याची प्रजाती आहे. ड्रॅगनफ्रूटला आशियाई देशांत पिताहाया किंवा पिताया (pitahaya किंवा pitaya) या नावानेही संबोधले जाते. आता भारतात त्याला कमळ म्हणून संबोधले जाणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1351616604069457922

“ड्रॅगन फ्रुट’’ हे मधुमेह, संधिवात, कर्करोग, दमा इत्यादी आजार नियंत्रित करते. शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. अन्नपचन शक्ती वाढवते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच या फळापासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. डेंग्यू व मलेरियाच्या आजारात ड्रॅगन हे फळ खाल्ले जाते. हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते व पांढऱ्या पेशीही वाढण्यात मदत होते

Leave a Comment

error: Content is protected !!