एकीकडे निर्बंध दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा; शेतकऱ्याने १० एकर फळबागेवर चालवली कुऱ्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षात शेतकऱ्यांना एकीकडे कोरोना निर्बंध आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो आहे. दैनंदिन जीवनात महागाई देखील वाढली आहे. अशा परिस्थितीत शेती करताना अंक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे दिसत आहे. याचाच फटका सांगली जिल्ह्यातील मिरजेतील एका शेतकऱ्याला बसला आहे त्यामुळे या शेतकऱ्याने आपल्या तब्बल १० एकर पेरूच्या फळबागेवर कुऱ्हाड चालवली आहे.

अन पेरू झाडावरच सडले …

महेंद्रसिंह बाळासाहेब शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महेंद्रसिंह शिंदे यांनी 2 वर्षांपूर्वी मिरज बेडग रोडजवळ असलेल्या 10 एकर शेतात लखनौ सरदार या जातीच्या पेरूची बाग लागवड केली होती. त्यावेळी साडे सात हजार पेरूची रोपं लागवड करण्यासाठी 25 लाख रुपये खर्च आला होता. या पेरूच्या बागेपासून वार्षिक 15 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी आशा होती. बागेत पेरूचे उत्पन्न सुरू झाले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागला.लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी शेतातील पेरू विकतच घेतले नाही. त्यामुळे पेरू झाडावरच सडले. यावर्षी तर बागेचा खर्च तरी निघेल असं वाटत होतं. पण अवकाळी आणि वादळी पावसाने आलेली फळे गळून गेली आणि मोठं नुकसान झालं.

पंचनामे झाले पण शासनाकडून मदत नाहीच

आल्यानंतर शासनाने पंचनामे केले खरे पण मदत काही दिली नाही, अशी तक्रार या शेतकऱ्याने केलीय. मदत न मिळाल्यानं अखेर सतत होणारं नुकसान टाळण्यासाठी संतप्त झालेल्या बागायतदार महेंद्रसिंह शिंदे यांनी 10 एकर बागेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. आज पेरूच्या फळासोबत 10 एकर बाग त्यांनी तोडून काढली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!